श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर

संस्थेच्या शाळांच्या इमारती/वर्गखोल्या तसेच स्वच्छतागृह बांधकाम /नूतनीकरणासाठी देणगीचे आवाहन

स.भु. च्या ‌‘गोविंदभाई श्रॉफ अध्यासन केंद्रा‌’स देणगीचा ओघ सुरू

छत्रपती संभाजीनगर (9 सप्टेंबर) श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या वतीने ‌‘गोविंदभाई श्रॉफ स्मृती दालन व अध्यासन केंद्र‌’ स्थापित करण्यात येत आहे. त्यासाठी समाजातील विविध क्षेत्रातून देणगीचा ओघ सुरू आहे.

सदरील अध्यासन केंद्रास देणगी म्हणून प्रा.चंद्रकांत न्यायाधीश यांनी रू.25,000/-, प्रा.श्रीराम जाधव यांनी रू.25, 000/-, स.भु. विज्ञान महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉ.क्षमा खोब्रागडे व डॉ.प्रा.धनराज कांबळे यांनी प्रत्येकी रू.10,000/- चे धनादेश संस्थाध्यक्ष ॲड.दिनेश वकील यांच्याकडे सुपूर्द केले.

हा कार्यक्रम स.भु. शिक्षण संस्थेचे मध्यवर्ती कार्यालयात झाला. या प्रसंगी स.भु. चे कोषाध्यक्ष मिलिंद रानडे, सहचिटणीस डॉ.रश्मी बोरीकर, स.भु.चे ज्येष्ठ सदस्य ज्ञानप्रकाश मोदाणी, स.भु. कला व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विवेक मिरगणे व प्राध्यापक व शिक्षकवृंद उपस्थित होते.

  • नवीन इमारत/वर्गखोल्यांचे बांधकाम.
  • संस्थेच्या ग्रामीण शाखेवर मुला-मुलींसाठी स्वतंत्र नवीन स्वच्छतागृहांचे बांधकाम.
  • संस्थेच्या ग्रामीण शाळांसाठी नवीन बेंचेस खरेदी.
  • स.भु. प्रशाला, छत्रपती संभाजीनगर जालान सभागृह नूतनीकरण.
  • संस्थेच्या ‘मायेची सावली’ या उपक्रमांतर्गत आर्थिक दुर्बल घटकांतील मुलामुलींसाठी मानवतावादी व सामाजिक बांधीलकीचा दृष्टीकोन ठेवून संबंधित विद्यार्थ्यांना यामध्ये वह्या, दप्तर, कंपास, पेन, पेन्सिल तसेच जेवणाचा डबा, वॉटर बॅग, गणवेश, सॉक्स, बूट इ. शालेय साहित्य मोफत वाटप करण्यात येते. ग्रामीण भागातील मुलींना शाळेत येणे सहज शक्य व्हावे म्हणून या उपक्रमांतर्गत काही सायकलींचेही वाटप करण्यात येते.
  • संस्थांतर्गत गणित, विज्ञान, रोबोटिक्स आणि भाषा प्रयोगशाळा.
Scroll to Top