Event-Details

आंतरराष्ट्रीय महिला दिन विशेष कार्यक्रम
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम

श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर यांच्या वतीने आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम रविवार, दि. ८ मार्च २०२६ रोजी सकाळी ९.१५ ते दुपारी ३.३० या वेळेत पल्लवांकूर लॉन्स येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

कार्यक्रमाचे आयोजन

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी संस्थेच्या सहसरचिटणीस डॉ. रश्मी बोरीकर यांनी पुढाकार घेऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसरचिटणीस श्री. रामेश्वर तोतला हे होते.

प्रमुख व्याख्यान

प्रमुख वक्त्या डॉ. अपर्णा अष्टपुत्रे (सहयोगी प्राध्यापक, मानसशास्त्र विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ) यांनी “निरोगी मन – आनंदी जीवन” या विषयावर मार्गदर्शन केले.

मानसिक आरोग्याचे महत्त्व

आपल्या व्याख्यानात त्यांनी महिलांनी विविध जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःच्या मनाची सकारात्मकता आणि मानसिक आरोग्य जपणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

सांस्कृतिक व मनोरंजन कार्यक्रम

महिला कर्मचाऱ्यांसाठी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, खेळ तसेच इतर मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. संगीत, ट्रॅक्टर राईड, संगीत खुर्ची आणि इतर खेळांमुळे कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

Give to Gain उपक्रम

“Give to Gain” या संकल्पनेवर आधारित महिला दिन साजरा करताना ४५ स्वच्छता सेविकांनाही या कार्यक्रमात सहभागी करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

उत्स्फूर्त सहभाग

संस्थेच्या १६ शाखांमधील एकूण ३३७ महिला कर्मचाऱ्यांनी या उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यक्रमामुळे सर्वांना नवचैतन्य आणि आनंददायी अनुभव मिळाला.

Scroll to Top